🌟आरटीआय कार्यकर्ते तथा समाजसेवक स.जगदीप सिंघ नंबरदार यांची प्रशासकांकडे मागणी🌟 नांदेड : - नांदेड येथील हजूर साहिब गुरुद्वारा बोर्डातील अनेक ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना डावलून नियमबाह्यरित्या पदोन्नत्या देण्यात आले आहेत अशा सर्व नियमबाह्य पदोन्नत्या रद्द करून पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती द्यावी अशी मागणी आरटीआय तथा सामाजिक कार्यकर्ते जगदीपसिंघ नंबरदार यांनी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंघ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गुरुद्वारा बोर्डातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा कायदा लागू होतो. या कायद्याप्रमाणे बोर्डातील कर्म…
🌟श्री संत मोतीराम महाराज यांच्या 61 व्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन🌟 पुर्णा : - पुर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथे ब्रम्हीभूत ब्रम्हचैतन्य स्वानंद सुखनिवासी श्री संत मोतीराम महाराज यांच्या 61 व्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह सोहळ्यात पहाटे 4ते6 काकड आरती ,6 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 1 तुकाराम गाथा भजन ,1 ते 3 भावार्थ रामायण 3 ते 4 ज्ञानेश्वरी प्रवचन, 5 ते 7 हरिपाठ ,9 ते 11 हरिकीर्तन, नंतर हरी जागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत बुधवार दिनांक 6 रोजी ह .भ .प. भगवान महार…
🌟अज्ञात समाजकंटकाच्या धमकीमुळे कर्नाटक महाराष्ट्र आणी तेलंगानातील शीख समाजात अस्वस्थता🌟 ✍️स.रविंदरसिंघ मोदी नांदेड नांदेड - महाराष्ट्र राज्यातील पवित्र तख्त सचखंड गुरुद्वारा श्री हजूर साहिब नांदेड या जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या कर्नाटक राज्यातील बिदर शहरातील पवित्र तिर्थक्षेत्र श्री नानकझीरा साहेब गुरुद्वाराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे मिळाली आहे त्यामुळे कर्नाटक महाराष्ट्र आणी तेलंगानातील शीख समाज अस्वस्थ झाला आहे. कर्नाटक येथील बिदर शहरात शीख धर्माचे पाहिले गुरु श्री गुरु नानक देवजी यांचा गुरुद्वारा विद्यमान आहे. गुरुद…
🌟राष्ट्रवादी काँग्रेस ही गुंडांची टोळी : कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल🌟 मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी भाजप महायुतीच्या सत्ताकाळात राज्यात सर्वत्र गुन्हेगारीने नवा उच्चांक गाठला आहे. बहुतांश गुन्हेगारी घटनांतील आरोपी हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून त्यांना सरकारचे अभय असल्याचे वारंवार दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या विविध गुन्हेगारी कृत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षाशी संबंधित लोकांचा मोठा सहभाग दिसून आला आहे, हे अत्यंत गंभीर असून राष्ट्रवादी…
🌟किरू जलविद्युत प्रकल्प भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने दाखल केले आरोपपत्र🌟 नवी दिल्ली: - जम्मू काश्मीर राज्याचे माजी राज्यपाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे सत्यपाल मलिक यांच्या विरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील किरू जलविद्युत प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरणाशी संबंधित मलिक यांच्यासह सात जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल झाल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. इतर आरोपींमध्ये चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स प्रा. लि.चे एमडी एम.एस.बाबू,बोर्डाचे संचालक एम. के. मित्तल आणि अरुण कुमार मिश्रा, खासगी स…
🌟अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत मोठी चूक मध्यरात्री अज्ञात महिला थेट घुसली घरात सुरक्षरक्षकांचा वेढा भेदून महिला घरात🌟 ✍️ मोहन चौकेकर 1) वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण! अखेर वैष्णवीचं बाळ कस्पटे कुटुंबियांच्या ताब्यात; अज्ञात व्यक्तीने फोन करुन दिलं बाळ ;हगवणेंच्या मोठ्या सूनेचीही हादरवणारी कहाणी, वैष्णवीचा पती शशांक हगवणेकडून वहिनी मयुरी जगतापला मारहाण, मयुरीच्या भावाने दाखवला CCTV ; हगवणे कुटुंबीयांकडून माझ्या मुलीलाही मारहाण, करिष्मा अन् शशांककडून सर्वाधिक त्रास; मयुरी जगताप यांच्या आईचा खळबळजनक आरोप ; पुण्यात आणखी एका विवाहितेचा हुंड्…
🌟सर्वोच्च न्यायालयाकडून ईडीच्या कारभारावर अत्यंत कडक शब्दात ताशेरे🌟 ✍️ मोहन चौकेकर ईडीच्या कारभारावरून सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढताना संविधान आणि संघराज्य रचनेचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज (22 मे) तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन (TASMAC) च्या मुख्यालयावर छापे टाकल्याबद्दल अंमलबजावणी संचालनालयाला (ED) अत्यंत कडक शब्दांमध्ये फटकारले आणि या प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात केंद्रीय एजन्सीने सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती दिली. 💫ईडी सर्व मर्यादा ओलांडत संविधान आणि संघराज्य रचनेच…
🌟शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी चर्चा व भेटीगाठी घेणार🌟 परभणी : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे दि.२३ मे २०२५ रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे. शुक्रवार दि. २३ मे रोजी दुपारी १२.३० वाजता नांदेड येथून शासकीय विश्रामगृह परभणी येथे आगमन व राखीव दुपारी ०१.३० वाजता प्रमोद वाकोडकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दुपारी ०२.०० वाजता शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी चर्चा व भेट (स्थळ-शास…
🌟परभणी महानगर पालिकेचा बेजबाबदार कारभार : शहरातील नागरीक झाले हतबल : दररोज घडताय अपघात🌟 परभणी : परभणी महानगर पालिका प्रशासनासह आयुक्तांचा बेजबाबदार कारभार शहरातील नागरिकांसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरत असून कोट्यवधी रुपयांची रस्ते नाल्यांची काम अर्धवट सोडण्यात आल्याने या अर्धवट कामांचा फटका नागरिकांना बसत आहे शहरातील गुलशनाबाग परिसरातील सिमेंट नालीचे अर्धवट बांधकाम महानगर पालिका प्रशासनाचा बेजबाबदार कारभार उजागर करीत असतांनाच शहरातील मध्यवस्तीतील गव्हाणे रोडच्या रुंदीकरणासह मजबुतीकरणाचे काम देखील अर्धवट झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये अस…
🌟राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी स्पष्टीकरण🌟 बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे भोर तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी मृत्यू प्रकरणात दोषी असेल तर मला फासावर लटकवावा पण बदनामी करु नका अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. वैष्णवीच्या लहान बाळाला तीच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे भोर तालुकाध्यक्ष तथा माजी आ. राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे य…